द्रुतगती मार्गावर आडोशीजवळ ट्रक उलटला

0

पिंपरी-चिंचवड : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आडोशी गावाजवळ मुंबईकडे जाणारा एक ट्रक अचानक उलटला. हा अपघात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ खोळंबली होती. ट्रक क्रेनच्या साहाय्याने रस्त्यावरून हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात
पुण्याहून मुंबईकडे पीओपीचे साहित्य घेऊन जाणारा ट्रक आडोशी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे उलटला. या अपघातात ट्रकमधील सर्व साहित्य रस्त्यावर पसरल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ खोळंबली होती. या अपघातामध्ये चालक जखमी झाला असून, त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत, बोरघाट पोलीस, सनी डेल्टा फोर्सच्या कर्मचार्‍यांनी क्रेनच्या साहाय्याने ट्रक व रस्त्यावरील साहित्य हटवले. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ववत झाली.