द.आफ्रिकेची डेमी ले नेल पीटर्स ‘मिस युनिव्हर्स’

0

लास वेगास : मानुषी छिल्लरने विश्वसुंदरीचा किताब पटकवल्यानंतर आता मिस युनिव्हर्सचा किताबही जाहीर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या ‘डेमी ले नेल पीटर्स’ हिने मिस युनिव्हर्सचा किताब पटकवला. माजी मिस युनिव्हर्स इरिस मिटेनाएरेने डेमीला ‘मिस युनिव्हर्स’चा मुकूट घातला आणि तिचे अभिनंदन केले. पीटर्सनंतर कोलंबियाच्या लॉरा गोंजालेज दुसर्‍या क्रमांकावर तर जमैकाची मिस डेविना बेनेट हिने तिसर्‍या क्रमांक पटकावला आहे.

या स्पर्धेमध्ये जगभरातून 100 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अंतिम फेरीमध्ये दक्षिण आफ्रिका, जमैका आणि कोलंबियाचे स्पर्धकच पोहोचले होते; तर टॉप 10 मध्ये अमेरिका, व्हेनेझुएला, फिलिपिन्स, कॅनडा, दक्षिण अफ्रिका, स्पेन, ब्राझील, थायलंड, जमैका आणि कोलंबियाच्या स्पर्धकांनी जागा पटकावली होती. लास वेगासमध्ये झालेली मिस युनिव्हर्सची स्पर्धा तशी भारतासाठी जरा कठीणच होती. कारण श्रद्धा शशीधर टॉप 10मध्ये जाण्यात अपयशी ठरली. खरंतर भारताची मानुषी छिल्लर विश्वसुंदरी झाल्यामुळे श्रद्धा शशीधरकडून सगळ्यांनाच खूप अपेक्षा होत्या.