‘द कपिल शर्मा’शोच्या पहिल्या भागात ‘सिम्बा’ टीम

0

मुंबई : कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा २९ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘द कपिल शर्मा’ शोचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून रणवीर आणि सारा या पहिल्या भागात दिसणार आहे.

‘सिम्बा’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे कलाकार कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. या दोघांसोबतच दिग्दर्शक रोहित शेट्टीदेखील दिसणार आहे. येत्या २८ डिसेंबरला ‘सिंबा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर दुसरीकडे ‘द कपिल शर्मा शो’च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.