बालमजुरी या अनिष्ट प्रथेच्या विरोधात राज्य शासनाच्या कामगार विभागातर्फे जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्या मोहीमेचा एक भाग म्हणून कामगार आयुक्तालय आणि पूना मर्चंट्स चेबर्स यांच्या वतीने जिल्हयातील सर्व व्यापारी संघटनांचे चर्चासत्र घेण्यात आले. त्यामध्ये, बालकामगारमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी शपथ घेण्यात आली. व्यापारी वर्गाचा त्यासाठी मोठा प्रतिसाद मिळाला आणि ही अनिष्ट प्रथा मोडून काढण्याचा निर्धार करण्यात आला. चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, वालचंद संचेती, विजय मुथा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे भूसार प्रमुख नितीन रासकर, माथाडी बोर्डाचे राजेश मते, पंकजा बांदल, मिनाक्षी चौधरी, हमाल पंचायतीचे नवनाथ बिनवडे, गोरख मेंगडे, चंद्रकांत मानकर उपस्थित होते.
हे देखील वाचा