मुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोनसच्या लग्नाला अवघे काही दिवसच राहिले आहेत. त्यानंतर ती परदेशी सून होणार आहे. राजस्थानच्या उमेद भवनामध्ये त्यांच्या लग्नाची तयारी सुरू आहे.
प्रियांका निकसोबत लग्न करणार असल्याने हॉलिवूडच्या पाहुण्यांचे आगमन होणारच आहे. हा एक इंटरनॅशनल विवाह असणार आहे. त्यामुळे हॉलिवूड अभिनेता ‘द रॉक’ लग्नात हजेरी लावणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे तो हेलीकॉप्टरने विवाहस्थळी एन्ट्री करणार आहे.
प्रियांका आणि रॉक ‘बेवॉच’ या हॉलिवूड चित्रपटात एकत्र झळकले होते. तसेच त्याने ‘जुमानजी’ या चित्रपटात निकसोबत काम केले आहे. प्रियांका आपल्या फमिली सोबत जोधपुरला रवाना झाली आहे. दोघांच्या लग्नाच्या विधी २९ नोव्हेंबरपासून ते ३ डिसेंबरपर्यंत पार पडणार आहेत.