द.शि.विद्यालयाचा संघ ठरला जिल्हा स्पर्धेसाठी पात्र

0

भुसावळ । नगरपरिषद संचलित द. शि. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील कबड्डी स्पर्धेचा संघ भुसावळ तालुकास्तरावर अजिंक्य ठरल्याने जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. भुसावळ येथील बियाणी मिलीटरी स्कूलमध्ये नुकतीच शासकीय तालुका कबड्डी स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पंचायत समिती भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच घेण्यात आली.

यशस्वी खेळाडुंचा करण्यात आला सत्कार
नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, माध्यमिक शिक्षण सभापती शैलजा नारखेडे, मुख्याध्यापक जे.बी. राणे, पर्यवेक्षक के.डी. पाटील, ज्येष्ठ शिक्षक डी.पी. ढाके, एस.बी. पाटील,
एस.पी. पाटील, डॉ. जगदीश पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

aस्पर्धेत भुसावळ शहर व तालुक्यातील 8 शाळांचे संघ सहभागी झाले होते. यात 19 वर्षाखालील वयोगटात द. शि. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने अटीतटीच्या अंतिम सामन्यात 29-24 च्या फरकाने 5 गुणांनी नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाला हरवून विजय पटकावला. त्यामुळे द. शि. विद्यालयाचा संघ तालुकास्तरावर अजिंक्य ठरल्याने जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या संघात कर्णधार नितेश सोनवणे, उपकर्णधार विक्की खंडारे, पुष्पराज जठार, गजानन पाटील, भूषण गवळे, राजेश महाजन, हर्षल ठाकूर, आकाश नाले, रोहित पगारे, गणेश खरे, कल्पेश चांदेलकर, आकाश लोखंडे या खेळाडूंचा समावेश होता. खेळाडूंना क्रीडा शिक्षक बी.एन. पाटील, एस.ए. मंदवाडे, एस.एस. भोई यांनी मार्गदर्शन केले.