रावेर( प्रतिनिधी): धक्कादायक रावेर महसूल विभागात कोरोनाचा शिरकाव झाला असून एक 29 वर्षीय लिपिक तर दूसरे मुख्य लिपिकाचे कुटुंब कोरोना पोझिटिव्ह आल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
रावेर महसूल विभागात देखिल जिवघेणा कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून काल आलेल्या रिपोर्ट मध्ये महसूल विभागाचे एक लिपिक कोरोना पोझीटीव्ह आला असून दूसरे मुख्य लिपिक यांची मुलगी,मुलगा,आणि पत्नी कोरोना पोझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.यामुळे महसूल विभागातील इतर कोणते कर्मचारी व अधिकारी यांच्या संपर्कात आले आहे. तसेच बाहेरील इतर कोणते नागरीक यांच्या संर्पकात आले याचा शोध घेण्याचे अवाहन आरोग्य प्रशासना पुढे आहे. तसेच महसूल विभाच्या इतर व्यक्तीचे देखिल आज स्वॅब घेण्यात येणार असल्याचे वृत्त आहेत.