धक्कादायक ! इस्टेट ब्रोकरकडुन सेवानिवृत्त प्राध्यापकाची ३७.५० लाखांत फसवणुक

 

 

एरंडोल: येथे शेतजमीन व फ्लँट खरेदी व्यवहारात सेवानिवृत्त प्राध्यापक रघुनाथ शंकर निकुंभ यांची इस्टेट ब्रोकर आनंदा रामदास चौधरी रा. एरंडोल व राजेंद्र अमृत धनगर रा.खेडगाव ता. एरंडोल यांनी साडे सदतीस लाख रूपयांत फसवणुक केल्याप्रकरणी सोमवारी राञी उशिरा एरंडोल पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला.

आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.या कारवाईमुळे एकच खळबळ माजली आहे.

धनगर यास धरणगाव चौफुली परीसरातुन व चौधरी यास राहत्या घरातुन पोलिसांनी ताब्यात घेतले.

पंकज पाटील,संदीप पाटील, अकील मुजावर,मिलींद कुमावत,रविंद्र वाघ, अशोक तायडे यांनी जळगाव च्या पथकास सहकार्य केले.

 

वेगवेगळया शेतजमीनींच्या ११ खरेदी व्यवहारात तसेच एका फ्लँटच्या खरेदी व्यवहारात प्राध्यापक निकुंभ यांची फसवणुक झाल्याची तक्रार देण्यात आली आहे.

 

पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव हे पुढील तपास करीत आहेत.