मुंबई – वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याकडून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा फोन टॅप होत होता. याबाबद कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
रश्मी शुक्ला यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले माजी मंत्री एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचा फोन टॅपिंग केला असल्याचा उल्लेख एफआयआर कॉपी मध्ये आहे, अशी माहिती समोर आलीय.
राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केले होते. काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन टॅप केल्या प्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात भारतीय टेलिग्राफ ऍक्टच्या कलम 26 तसेच भादवि कलम 166 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.