धक्कादायक: एम.डी.असल्याचे सांगून रुग्णाची तपासणी; तोतया डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात

0

जिल्हा रुग्णालयातील प्रकार ; रुग्ण तरुणीच्या वडीलांमुळे प्रकार आला समोर

जळगाव– जिल्हा रुग्णालयात एम.डी. डॉक्टर असल्याची बतावणी करुन वार्ड क्रमांक चारमध्ये 12 वर्षीय तरुणीची तपासणी करुन तिला इंजेक्शन देण्याच्या तयारीतील मद्यधुंद तोतया डॉक्टरला नागरिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. मुकेश चंद्रशेखर कदम वय 30 रा. मोहाडी असे तोतया डॉक्टरचे नाव आहे. मंगळवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने जिल्हा रुग्णालयात एकच गोंधळ उडाला होता.

तोतया असल्याचा भंडाफोड झाल्याचे लक्षात येतात, संबंधित तोतया डॉक्टर तरुणाने वार्डातून पसार झाला. यानंतर तरुणीच्या वडीलांसह पारिचारिका तसेच डॉक्टरांनी तोतयाचा पाठलाग केला. मागच्या बाजूने तोतया डॉक्टर स्थेटेस्कोप फेकून पसार होण्याच्या तयारीत होता. तेवढ्याच पाठलाग करत असलेल्या तोतया डॉक्टरला नागरिकांसह जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी ताब्यात घेतले. जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत कार्यरत सहाय्यक फौजदार किरण पाठक व पोलीस कॉन्स्टेबल राहूल घेटे या कर्मचार्‍यांच्या स्वाधीन केले. यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी पाचारण करुन जमाव पांगविला. तसेच संबंधित मुकेश कदम या तोतया डॉक्टरला ताब्यात घेतले. मी कुठलीही तपासणी केली नसून स्थेटेस्कोप माझा नसल्याचे तरुण सांगत होता. हा तरुण समाजसेवक म्हणून रोजच जिल्हा रुग्णालयात वावरत असल्याची माहिती मिळाली. संबंधित रुग्ण तरुणीच्या वडील यांनीही जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले होते. जिल्हापेठ पोलिसांची कारवाई सुरु होती.