कानपूर: तळागाळातील माणसांपासून तर सेलिब्रेटींपासून सगळेच कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या कमला राणी वरूण यांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कमल वरूण यांच्याकडे तंत्रशिक्षण मंत्रालय होते. त्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या सदस्य होत्या. या अगोदर त्या खासदार देखील राहिलेल्या आहेत. त्यांच्यावर लखनऊमधील पीजीआय येथे उपचार सुरू होते. १८ जुलै रोजी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता, तेंव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.
कमल राणी वरूण यांचा राजकारणात दबदबा होता. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपने कानपूर जिल्ह्यातील घाटमपूर विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. त्यांनी विजय मिळीवला होता. या मतदार संघात विजय मिळविणाऱ्या त्या भाजपच्या पहिल्या उमेदवार होत्या. २०१९ मध्ये त्यांना मंत्रीपद देण्यात आले होते. पक्षातील त्यांचे कार्य उल्लेखनीय होते. त्यांच्या मृत्यूने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले आहे. “कमल राणी वरूण यांच्या मृत्यूची बातमी वेदनादायी आहे. त्यांच्या निधनाने उत्तर प्रदेशचे मोठे नुकसान झाले आहे”, अशा शब्दात योगींनी शोक व्यक्त केले आहे.
उत्तर प्रदेश सरकार में मेरी सहयोगी, कैबिनेट मंत्री श्रीमती कमल रानी वरुण जी के असमय निधन की सूचना, व्यथित करने वाली है।
प्रदेश ने आज एक समर्पित जननेत्री को खो दिया।
उनके परिजनों के प्रति मेरी संवेदनाएं।
ईश्वर दिवंगत आत्मा को अपने श्री चरणों में स्थान प्रदान करें।
ॐ शांति!
— Yogi Adityanath (@myogiadityanath) August 2, 2020
देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. देशातील करोनाबाधितांची संख्या आता १७ लाख ५० हजार ७२४ वर पोहचली आहे. मागील चोवीस तासांत देशभरात तब्बल ५४ हजार ७३६ नवे करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.