धक्कादायक! कोरोना मृतांचा आकडा २०००च्या वर जाणार !

 

नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार कटिबद्ध असतानाही कोरोनाचा फैलाव काही कामी होत नाहीये. यातच संपूर्ण भारताची चिंता वाढवणारा अहवाल नुकताच इंडिया टास्क फोर्स सदस्यांच्या आयोगाने प्रदर्शित केला आहे ज्यात म्हटलं आहे कि,भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दररोज १ हजार ७५० लोकांचा मृत्यू होऊ शकतो. तर जूनच्या पहिल्या आठवड्यात दररोज २ हजार ३२० लोक कोविडमुळे मरण पावतील.
भारतातील दुसऱ्या करोना लाटेच व्यवस्थापन : तातडीचे उपाय’ या नावाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात करोना महामारीच्या प्रमुख मुद्द्यांवर या अहवालात प्रकाश टाकण्यात आला असून, करोना संक्रमणाचा वेग कमी करण्यास परिणामकारक ठरणाऱ्या उपाययोजनांचीही शिफारस करण्यात आली आहे. दोन वेगवेगळ्या अंगानी बघितलं तर करोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा वेगळी असल्याचं अहवालात म्हटलं आहे.