धक्कादायक: कोरोना मृत्यूची संख्या एक लाखांच्या उंबरठ्यावर

0

नवी दिल्ली: देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज ८० हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहे. चिंताजनकबाब म्हणजे देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता ६३ लाखांच्या पुढे गेली आहे. बुधवारी एकाच दिवसात तब्बल ८६ हजार ८२१ रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ६३ लाख १२ हजार ५८५ झाली आहे. २४ तासात १ हजार १८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चिंताजनक परिस्थितीतही दिलासादायकबाब म्हणजे रिकव्हरी रेट देखील मोठा आहे. भारतातील रिकव्हरी रेट ८४ टक्क्यांच्या जवळ आहे. सध्या ९ लाख ४० हजार ७०५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. ५२ लाख ७३ हजार २०२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आतापर्यंत ९८ हजार ६७८ रुग्णांचा कोरोनामुले मृत्यू झाला आहे. भारतातील मृत्युदर दीड टक्केच आहे, मात्र संख्या मोठी आहे.

याव्यतिरिक्त देशात मोठ्या प्रमाणात करोना चाचण्याही वाढवण्यात आल्या आहेत. बुधवारी देशात एकूण १४ लाख २३ हजार ५२ करोना चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत देशभरात आठ कोटींच्या जवळ चाचण्या झाल्या आहेत.