धक्कादायक ! क्रिकेटपटू अश्विनचे निधन

हैदराबाद- अख्या भारतातील क्रिकेट प्रेमींना धक्का बसेल अशी दुखःद घटना आज घडली आहे.हैदराबादचा माजी वेगवान गोलंदाज अश्विन यादवचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे.
२००७मध्ये पंजाबविरुद्ध मोहालीमध्ये रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या यादवने १४ प्रथम श्रेणी सामन्यांत ३४ बळी घेतले होते. २००८-०९च्या हंगामात त्याने उप्पल स्टेडियमवर दिल्लीविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी केली होती. या सामन्यात त्याने ५२ धावा देऊन ६ बळी घेतले होते.