गडचिरोली: कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णात मोठी वाढ झाली आहे. देशाचे संरक्षण करणारे सैन्य दलाचे जवान देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. गडचिरोलीतील ७१ एसआरपीएफ जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. गडचिरोली येथील विलगीकरणात असलेल्या ७१ एसआरपीएफ जवानांचे कोरोना अहवाल रात्री पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्यात ४२४ पैकी आत्तापर्यंत २८६ जवान कोरोनाबाधित आढळले आहेत.
या नवीन ७१ बाधितांमूळे अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या २५० झाली. तर एकूण रूग्णांची संख्या ४२४ झाली आहे. आत्तापर्यंत १७३ रूग्ण बरे झाले तर एकाचा मृत्यू झालेला आहे.