जळगाव: जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाने महाराष्ट्रात अक्षरशः कहर केला आहे. जळगाव जिल्ह्यातील रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असताना आता जिल्हा परिषदेच्या एका पदाधिकाला कोरोनाची लागण झाली आहे. सोबतच जिल्ह्यातील एका पत्रकाराला देखील कोरोनाची लागण झाली आहे.
आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात जि.प.चे पदाधिकारी देखील पॉझिटिव्ह असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. यापूर्वी देखील जिल्हा परिषदेच्या एक पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर दोन्हीही बरे झालेले असताना आता जिल्हा परिषदेच्या आणखी एका पदाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.