धक्कादायक: दंगलीनंतर पाचव्या दिवशी रावेरात सापडला केरोसीन मिक्स डीझेलसाठा

0

रावेर: रावेर दंगलीच्या पाचव्या दिवशी पोलिसांनी कॅरोसिन मिक्स डिझेल साठा जप्त केला आहे. विशेषबाब म्हणजे जिल्ह्यात केरोसीन पुरवठा बंद असताना आणि दंगलीच्या पार्श्वभूमीवर शहरात केरोसीन मिक्स डीझेल सापडल्याने दंगल पूर्वनियोजित असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रावेर दंगल होऊन आज गुरुवार पाच दिवस असताना शहरातील काही ठिकाणी एलसीबीने सर्च ऑपरेशन राबविले यात एका माल वाहतुक गाडीमध्ये हा कॅरोसिन मिक्स डिझेल साठा सापडला. रावेर पोलिसांनी माल वाहतूक गाडीसह कॅरोसिन असे 1 लाख 77 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.