धक्कादायक: परतीच्या पावसाने राज्यात २८ जणांचा मृत्यू

0

मुंबई: बंगलाच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात परतीच्या पावसाने कहर केला आहे. पावसाळ्यात झाला नाही इतका पाऊस मागील दोन दिवसात झाला. पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे वृद्धांनी त्यांच्या आयुष्यात कधीही पहिला नाही इतका पाऊस झाल्याचे म्हटले आहे. परतीच्या पावसाने राज्यात २८ जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या सोलापुरात १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

परतीच्या पावसाने लाखो हेक्टरवरील पिकांचा नुकसान झाला आहे. ऐन काढणी-कापणीला आलेली पिके उद्ध्वस्त झाली आहे. या पावसाने बळीराज्याचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारकडून पंचनामा सुरु झाला आहे. आर्थिक मदतीचे नियोजन सुरु असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे.