नंदुरबार: शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी प्रचंड धुमाकूळ घातला आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात नेहरू नगरमधील हिताक्षी मुकेश माळी या सहा वर्षीय बालिकेला जीव गमवावा लागला आहे. उपचारासाठी सुरत येथे दाखल करण्यात आले होते. मात्र यात यश आले नाही. सुन्न करणारी अशी ही घटना असून या घटनेने पालकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त न करणार्या नगरपालिका यंत्रणेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागली आहे.