धक्कादायक: ‘पुन्हा आणूया आपले सरकार’ भाजपचा टी-शर्ट घालून शेतकऱ्याची आत्महत्या !

0

बुलढाणा : राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस सरकारवर आरोप होत असतानाच बुलढाणा जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळीच एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे ‘पुन्हा आणूया आपले सरकार’असे घोषवाक्य असलेले भाजपचा टी-शर्ट घालून शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.राजू ज्ञानदेव तलवारे असे 35 वर्षीय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपसाठी डोकेदुखे ठरणार आहे.

जळगाव जामोद इथून कामगार मंत्री डॉ संजय कुटे आमदार आहेत. शेगाव तालुक्यातील खातखेड येथे आज रविवारी सकाळी 11 वाजता हा प्रकार उघडकीस आला. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्जबाजारीपणामुळे त्याने आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे.