धक्कादायक: महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशला गेलेले 7 कामगार कोरोना पॉझिटिव्ह

0

मुंबई: करोनामुळे देशात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अडकलेल्या कामगार मजुरांना आहे त्याठिकाणीच थांबावे लागले होते. मात्र आता केंद्र सरकारने अडकलेल्या मजुरांना आपापल्या गावी जाण्यास परवानगी दिली आहे. कामगार घरी परतू लागले असून, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशमध्ये गेलेल्या कामगारांपैकी सात जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

३ मे रोजी लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्याची मुदत संपणार होती. ती आता 17 में पर्यंत वाढविण्यात आली आहे. विविध राज्यांनी कामगारांना परत नेण्याच्या मागणीचीही दखलही केंद्रानं घेतली. त्यामुळे राज्यांनी विविध राज्यात अडकलेले आपापल्या राज्यातील कामगार, विद्यार्थ्यांसह नागरिकांना परत नेण्याचं काम सुरू केलं आहे. कामगारांसाठी विशेष गाड्याही रेल्वे मंत्रालयानं सोडल्या आहेत.