शिरपूर:शहरात दहा कोरोनाचे रुग्ण निगेटिव्ह झाल्याची दिलासादायक बातमी समोर आली असतांना शहरात सोमवारी, 8 रोजी पुन्हा १० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.
सोमवारी, ८ रोजी दुपारी एकाच कुटुंबातील १० रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह झाले. त्यांना जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या उपस्थितीत डिस्चार्ज करण्यात आल्याने शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु शहरवासियांचा हा आनंद थोडाच काळ टिकला. कारण शहरातील २४ प्रलंबित अहवालांपैकी सायंकाळी पुन्हा १० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यात गोविंद नगरमधील ३०,
४७, २५ वर्षीय तीन पुरुष आणि २१ वर्षीय स्त्री, बौद्धवाडा खालचे गाव येथील ३६ वर्षीय १ पुरुष व १ स्त्री, १७ वर्षीय मुलगा, अंबिका नगरमधील ७ मुलगी व १६ वर्षीय मुलगा तर KG रोडवरील २२ वर्षीय स्त्री यांचा समावेश आहे.
आतापर्यंत शिरपूर तालुक्यात २६ व्यक्ती कोरोनामुक्त झाले असून ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.याकाळात शहरात उलट सुलट चर्चेला उधाण आले असून याबाबत प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला आहे. शहरातील नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये.
ही निव्वळ अफवा
“मंगळवारपासून शिरपूर पाच दिवस बंद असल्याची चर्चा आहे. मात्र, ही निव्वळ अफवा आहे.शासनाच्या नियम व अटीनुसार शहरातील व्यवहार सुरू राहतील.प्रशासनाकडून कोणत्याही बंदचा निर्णय झालेला नाही. नागरिकांनी अफवेकडे लक्ष देऊ नये.”
प्रांताधिकारी, शिरपूर