धनंजय महाडिक, चित्रा वाघ यांची भाजपात ‘या’ पदावर नियुक्ती !

0

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपामध्ये गेलेले कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडीक यांची कोल्हापूर प्रदेश उपाध्यक्षपदी तर चित्रा वाघ यांची मुंबईच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज गुरुवारी या नियुक्त्या जाहीर केल्या.

चित्रा वाघ या राष्ट्रवादीच्या मुंबई महिला अध्यक्ष होत्या. विविध कार्यक्रमांमध्ये त्या पक्षाची भूमिका मांडायच्या. पण काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करुन भाजपामध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक बडे नेते, पदाधिकारी यांनी अलीकडे भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आजच्या नियुक्त्यांवरुन त्यांना मोठी पदे मिळाल्याचेही दिसत आहे.