धनंजय मुंडेंना दिलासा; उच्च न्यायालयाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती

0

बीड: जिल्ह्यातील पुस, ता.अंबाजोगाई येथील जगमित्र शुगर मिल्ससाठी बेकादेशीररित्या जमीन खरेदी केल्याचे आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेला आहे. यावरून उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान कोर्टांच्या आदेशाविरोधात मुंडे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी झाली असता सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही.

दरम्यान आजच सकाळी सकाळी ७ वाजता धनजंय मुंडे यांच्यासह १४ जणांवर बिड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याला देखील स्थगिती मिळाली आहे. हा गुन्हा दाखल करावा यासाठी तक्रारदार राजाभाऊ फड हे गुरुवारी रात्रभर बर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये बसून होते.