धनंजय मुंडे सुखरूप; हेलिकॉप्टर भरकटल्याची केवळ अफवा !

0

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याचे वृत्त माध्यमातून आज सोमवारी २८ रोजी प्रसारित झाले. मात्र त्यांच्या हेलिकॉप्टर कोणत्याही प्रकारचे अपघात झाले नसून ते सुखरूप आहे. ही केवळ अफवा आहे अशी माहिती स्वत: धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत दिली.

कोल्हापूर येथे आयोजित असलेल्या सभेसाठी धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ जात असताना अचानक वाऱ्याच्या झोतामुळे त्यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याचे वृत्त होते.

‘मी बीड येथील गहिनीनाथगडाचा कार्यक्रम संपवून कोल्हापूरच्या सभेसाठी जात आहे. हेलिकॉप्टर भरकटल्याची बातमी चूक असून काहीही झालेले नाही, आम्ही १० मिनिटांत कोल्हापूरच्या विमानतळावर उतरू. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये. माझ्यावर भगवंताची कृपा आणि जनतेच्या सदिच्छा आहेत’ असे ट्वीट धनंजय मुंडे यांनी केले आहे.