धनगर समाजाचा जळगावात रास्ता रोको!

0

जळगाव । आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी धनगर समाजातर्फे आज सकाळी जळगाव शहरात रास्तो रोको आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाच्या एसटी या प्रवर्गात समावेश करावा व सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी राज्यातील धनगर समाजाने आज आंदोलनाची हाक दिली आहे. याच्या अंतर्गत राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. या अनुषंगाने आज जळगाव शहरात धनगर समाजबांधवांतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यात समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी वक्त्यांनी राज्य सरकारने लवकरात लवकरच या प्रकरणी निर्णय घ्यावा अन्यथा हे आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला. या आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येने वाहतुकीची कोंडी झाली होती.