जळगाव। मल्हारराव होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासाबरोबरच अनेक अध्यात्मिक ऐतिहासिक वास्तू उभारल्या. देशातील बरेच ज्योर्तिलिंग, मंदिरे, घाट, बारव त्यांनी उभारले. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली, तसेच अन्नछत्र, पाणपोया उभारल्या, वाटसरुंसाठी निवासाची व्यवस्था उभारली. स्त्री ही अबला नसून सबला आहे हा सामाजिक संदेश त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत समाजाला दिला अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी धनगर समाजाच्यावतीने साजरी करण्यात येत आहे. पुण्यतिथी निमित्ताने धनगर समाजबांधवांतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान गुरुवारी 17 रोजी धनगर समाजातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. सरदार वल्लभ पटेल लेवा भवन येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील 250 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन वसूंधरा लांडगे यांनी तर आभार धर्मा सोनवणे यांनी मानले.
विविध संघटनेच्या वतीने: धनगर समाज महासंघ, मल्हारसेना, कर्मचारी संघटना, अहिल्या महिला संघाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धनगर समजातील सर्व पोटशाखीय विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात धनगर समाज महासंघाच्या 39 वर्षातील उपक्रमाविषयी माहिती उपस्थितांना देण्यात आली. समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शरद वसतकर यांच्याहस्ते अहिल्यादेवींच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.
शासनाचा विरोध: गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाची आरक्षणासाठी लढाई सुरु आहे. मात्र शासन धनगर समाजबांधवांच्या मागणीचे दखल घेत नसल्याचे दिसून येते. यावेळी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर प्रकाश टाकण्यात आला. सोलापूर विद्यापीठास अहिल्यादेवींचे नाव दिल्यास जातीय तेढ निर्माण होईल असं म्हणणार्या शिक्षणमंत्र्यांच्या व्यक्तव्याचा निषेध करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
प्रमुख पाहूणे म्हणून डॉ.हेमंत कुलकर्णी, सुभाष सोनवणे, शरद वसतकर, प्रभाकर न्हाळदे, संतोष धनगर, सुधीर राऊत, राजधर पांढरे, हिलाल सोनवणे, संदीप तेले, विष्णू ठाकरे, सुभाष करे, दिलीप धनगर, रामचंद्र चर्हाटे, गणेश बागुल, महेंद्र सोनवणे, धर्मा सोनवणे, गणेश जाणे, डॉ.संजय पाटील, संदीप मनोरे, रुपेश पाली, प्रविण पाचपोळ, रेखा न्हाळदे, मंजूषा सूर्यवंशी, डिगंबर सोनवणे, प्रविण पवार, प्रविण धनगर, सुनिल खोमणे, गणेश बागुल, संदिप पवार आदी उपस्थित होते. तसेच विद्यार्थ्यांसह पालकांचीही यावेळी उपस्थिती होती.
होळकर बहुउद्देशिय संस्था
अहिल्याबाई होळकर बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने 13 ऑगस्ट 2017 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डी. बी. पांढरे, प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर जाधव, इतिहासाचे अभ्यासक प्रा. रामचंद्र पाटील, डी. बी. पांढरे उपस्थित होते. इतिहासाचे अभ्यासक प्रा. रामचंद्र पाटील यावेळी मार्गदर्शन केले.त्यांनी अहिल्यादेवींच्या कारकिर्दीतील व्यवस्थेविषयी मार्गदर्शन करत अहिल्यादेवींच्या कार्यालविषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंकर जावळे, गिरीष भावसार, टी.बी.पांढरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीष भावसार यांनी केले तर आभार प्रदर्शन मनोज पाटील यांनी मानले. तसेच उपस्थित मान्यवरांनी आपआपली मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.