वरणगाव। गेल्या दोन वर्षापासून विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते मात्र त्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने वरणगाव शहरातील धनगर समाजातर्फे 12 रोजी राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांना बसस्थानक चौकात आयोजीत सत्कार प्रसंगी निवेदन देवून एसटीमध्ये समावेश करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा
सदर निवेदनात म्हटले की, घटनेत नमूद केल्या नुसार धनगर समाजाचे आरक्षणाबाबत घटनेतील 36 व्या क्रमांकावर आरक्षण देण्यात यावे. धनगर समाज आजही वाड्या वस्त्यावर आपली मेंढरे घेऊन आपली उपजिवीका भागवीत आहे. धनगरांचे मुले शिक्षणापासून वंचीत राहतात. आजही धनगर उन्हात तान्हात पावसाळ्यात मेढरांमागे पाई चालतात. त्यांच्या पायात साध्या चपला घेण्यापूर्ती सुध्दा आर्थीक परीस्थिती नसते तर त्यांच्या पाल्यांची शिक्षणाची स्थिती काय असणार याचा सखोल विचार करून घटनेची अंमलबजावणी सरकारने करावी. तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देताना यांची होती उपस्थिती
याप्रसंगी निवेदन देताना जळगाव जिल्हा जय मल्हार सेनेचे अध्यक्ष सुकलाल धनगर, शहराध्यक्ष शामराव धनगर, बी.आर. बोरसे, महारु धनगर, शालीक ठोके, समाधान धनगर, झिपरु धनगर, मधुकर वैदकर, गजानन वाघ, अरुण धनगर, भास्कर धनगर, दिपक धनगर, संतोष धनगर, देविदास धनगर, रुपेश धनगर, बापू धनगर, गणेश धनगर, नितीन धनगर, रविंद्र धनगर, मंगल धनगर, शिवाजी धनगर, संजय धनगर, राजेश चिंचोरे, प्रविन कंखरे आदी समाज बांधव उपस्थित होते.