धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी 13 रोजी रावेरमध्ये रस्ता रोको

0

रावेर- धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीची अंमल बजावणी करावी या मागणीसाठी धनगर समाजातर्फे 13 रोजी रावेर येथे रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला. शहरातील नवीन शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परीरषदेत माजी शिक्षण सभापती सुरेश धनके यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी अ‍ॅड.प्रवीण पाचपोहे, डॉ.भगवान कुवटे, हिलाल सोनवणे, देविदास हडपे, संदीप सावळे, सरपंच मोहन बोरसे, स्वप्नील सोनवणे, प्रवीण अजलसोंडे ,गणेश बोरसे, विकास केरळकर आदी धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.