संपर्क कार्यालयाला भेट देऊन पाठींब्याचे दिले पत्र
धुळे । उत्तर महाराष्ट्र सर्व शाखीय धनगर समाज आयोजित धनगर समाज क्रांती आंदोलनास धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पाठिंबा जाहीर केला आहे.रविवारी १७ रोजी संपर्क कार्यालयात जाऊन धुळे जिल्हाध्यक्ष मनोज भाऊ मोरे यांनी त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले.
पक्ष तुमच्या पाठीशी राहणार
धनगर समाजाच्या विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात येत असल्याने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे पाठींबा देण्यात आला आहे. त्याच बरोबर भविष्यातील धनगर समाजावर असे अत्याचार जर झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी धनगर समाजाचा पाठीशी उभे राहू असे सांगण्यात आले. यावेळी राजू बोरसे, रजनीश निंबाळकर, सुनीलवाघ, आपा खताळ, विनोद खेमनार, संदीप खताळ, मनोज कोळेकर, भारत शिंदे, अशोक गिळे, सतिष खताळ, मोहित कोळपे आदी उपस्थित होते.