मुंबई-धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा, या मागणीसाठी आजपासून धनगर समाज रस्त्यावर उतरणार आहे. शेळ्या, मेंढ्या घेऊन धनगर समाजबांधव आंदोलन करणार आहे.
औरंगाबाद, जळगाव येथे रास्तारोको केले जाणार आहे तर जालन-औरंगाबाद महामार्गावरील बदनापूर येथे गोंधळ आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान काळ धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनाच्या बैठकीची तयारी सुरू असतानाच तालुक्यातील गोेमेवाकडी येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.