धनगर समाज बांधवांवरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी

0

साक्री। साक्री तालुक्यातील दिघावे, तानाजीनगर, शेलबारी गावातील पारंपारिक गुरचरण, गायरान वनजमीनीवरील अतिक्रमण थांबवून गावातील मेंढपाळ, ठेलारी, धनगर लोकांवर केलेल्या खोट्या केसेस मागे घेण्याची मागणी धनगर समाज संघर्ष समितीतर्फे तहसील कर्यालयात आस्थापना विभागातील अतुल महाले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देतांना धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष रमेश सरग, बाळु टकले, पोपट टकले, नाना टकले, भटु गोयकर, साहेबराव सरक, सोनु टकले, आनंदा गोयकर, पोपट पांढरे आदी उपस्थित होतेे.

अतिक्रमण करणार्‍यांविरुद्ध कारवाईची मागणी
साक्री तालुक्यातील मेंढपाळ, ठेलारी समाजातील लोक मेंढपाळ व्यवसायकरून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. दिघावे, तानाजीनगर, शेलबारी या गावाच्या शिवारातील वनविभागाच्या शासकीय जमीनीवर अतिक्रमण केले जात आहे. ज्या लोकांनकडे स्वतंत्र मालकीच्या व वडिलोपार्जित जमिनी आहेत असे लोक देखिल राखीव गुरचरण, गायरान, पाणवठा, वहीवाट रस्ते इत्यादीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केले जात आहे.त्यामुळे मेंढया चारण्यासाठी राखीव गुरचरण नष्ठ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मेंढया चारण्यास जागा राहणार नाही यामुळे मेढयांची उपासमार होईल व मेंढया मरण पावतील. मेढपाळ व्यवसाय धोक्यात आलेला आहे .वनजमीनीवर होत असलेल्या अतिक्रमणमुळे वनस्पती, वन्यप्राणी, पाळीव प्राणीचे चाराचा प्रश्न गंभीर होणार आहे. अतिक्रमण करणारे लोक आमच्या समाजातील लोकांना धमकावत अट्रॅसिटी केसेस दाखल करण्याची धमकी देत आहेत. तरी वनविभागाच्या अधिकार्‍यांनी योग्य चौकशी करून कारवाई करावी. राजकीय, सामाजिक संघटना अतिक्रमण करणारे लोकांना प्रोत्साहन देत आहेत. वनजमीनीवरील झाडे तोडून, खेेणा, गाडूण आखणी केली जात आहे. त्यामुळे शासकीय वन जमीन कमी होत चालली आहे. मेंढपाळ, ठेलारी, धनगर समाजात असंतोष व असुरक्षितता निर्माण झाली आहे. याविषयी आढवडयाभरात त्वरित निर्णय ध्यावा अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.