धनगर समाज संघर्ष समितीच्या प्रदेशउपाध्यक्षपदी सुरेश धनके

0

रावेर । महाराष्ट्र धनगर समाज संघर्ष समितीच्या प्रदेशउपाध्यक्षपदी रसलपुर येथील माजी आरोग्य सभापती सुरेश धनके यांची निवड करण्यात आली आहे तर जिल्हाध्यक्षपदी संदीप सावळेची निवड करण्यात आली आहे. याबाबत वृत्त असे की, महाराष्ट्रभर धनगर समाज संघर्ष समितीची कार्यकरणी प्रदेशाध्यक्ष बापुसाहेब शिंदे यांनी नुकतीच जाहीर केली. ज्यावेळी जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सुरेश धनके यांच्यावर सोपविण्यात आली आहे. श्री धनके तालुक्यातील भाजपाचे निष्ठावान सदस्य असून अनेक महत्वाची पदे त्यांनी भूषवली आहे.