कोंढवा: बेरोजगार, भूमिहीन, असंघटीत कामगारांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार असल्याचे धनराज गवळी यांनी सांगितले. भूमिहीन, मजूर, असंघटीत कामगार संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी व चालक-मालक वाहतूक संघ प्रदेश मुख्य निरीक्षकपदी धनराज गवळी यांची नुकतीच निवड झाली.
त्यांना नियुक्तीचे पत्र संघाचे अध्यक्ष संजय रणदिवे, प्रदेश संपर्कप्रमुख विकास गडकर, प्रदेश मुख्य निरीक्षक नानासाहेब शिंदे यांनी नुकतेच दिले. यावेळी राजेंद्र शिंदे, राकेश तुपे, स्वप्नील तांबे, संजय घुगे, संभाजी गवळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.