नवापूर । नेहरू युवा केंद्र नंदुरबार आणि जोशाबा सरकार युवा मंडळ नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय आश्रम शाळा धनराट येथे नुकताच समूह शेजार युवा संसद कार्यक्रम साजरा करण्यात आला.याप्रसंगी उद्घाटक प्रा. डॉ. जगदीश काळे हे होते. प्रास्तविक जोशाबा सरकार युवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. नितीनकुमार माळी यांनी केले. भरत सैंदाणे, अॅड. वर्षा बसावे, प्रा. डॉ. मंदा मोरे, मुख्याध्यापक ए. बी. वसावे, अधिक्षक अतुल गुर्डे आदी उपस्थित होते.
चुकीचे निर्णय घेवू नये
भरत सैंदाणे यांनी स्वच्छ भारत अभियान आपल्यापासून सुरू केल्यास देश स्वच्छ होईल यासाठी शासनाची जेवढी महत्वाची जबाबदारी असेल तेवढीच आपली देखील महत्वाची भूमिका आहे असे सांगितले. अॅड. वर्षा वसावे यांनी महिलांचे अधिकार व कायदे या विषयावर बोलतांना विशेषतः झगडा पद्धतीवर प्रकाश टाकला. अल्पवयात चुकीच्या निर्णयामुळे मुलींना खूप भोगावे लागते म्हणून अल्पवयात चुकीचे निर्णय घेवू नये जेणे करूंन कोर्टाची पायरी चढवी लागणार नाही असे प्रतिपादन केले.
महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला
प्रा. डॉ. मंदा मोरे यांनी महिला सबलीकरण हा मुद्दा मांडतांना महिलांकडे पाहण्याचा द्रुष्टिकोन बदलण्याची गरज असल्याची गरज व्यक्त केली जेणे करून भावी काळात या विषयावर चिंतन करण्याची गरज भासणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्याध्यापक ए. बी. वसावे यांनी स्वयंरोजगारातून नवनिर्मितीकडे या विषयावर बोलतांना नैतिकतेची आवशकता असल्याची भूमिका व्यक्त केली.
यांनी पाहिले कामकाज
अध्यक्षीय भाषणात डॉ. जगदीश काळे यांनी मुलगी संवेदनशील नातं असल्याचं उदाहरण देऊन वातावरण भाऊक केले.र सूत्रंसंचालन रीतू गावित यांनी तर आभार निलीमा माळी यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यश्स्वीतेसाठी तालुका प्रतिनिधी अर्चना गावित, प्रा. किशोर सोनवणे, गणेश महाजन, हितेश गावित, शीतल वसावे, योहान गावित, शंकर गावित, पावलेस गावित तसेच सर्व बी. एड.च्या विद्यार्थी शिक्षकानी परिश्रम घेतले