फैजपूर- धनाजी नाना महाविद्यालयात ‘धनोत्सव’ वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त पारंपरीक वेशभूषा, वक्तृत्व स्पर्धा ‘सांस्कृतिक दहशतवाद’ या विषयावर तर ‘भाडोत्री आई काळाची गरज’ या विषयावर वाद-विवाद स्पर्धा तसेच काव्यवाचन स्पर्धा झाली व ‘स्वच्छ व सुंदर भारतासाठी बांधीलकी’ या विषयावर निबंध स्पर्धा झाली. केशरचना, नेलआर्ट, विविध मॉडेल तयार करण्याच्या स्पर्धाही झाल्या. उद्घाटन उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.आय.भंगाळे यांनी केले.
भारतीय वेशभूषेचे दर्शन
परीक्षण डॉ.जगदीश पाटील, डॉ.सतीष चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.जगदीश खरात यांनी तर आभार प्रा.सतीश पाटील यांनी केले.पारंपरीक वेषभूषा स्पर्धेत भारतीय वेषभुषेचे दर्शन घडले. या स्पर्धेचे आयोजन प्रा.डी.आर.तायडे यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण प्रा.वंदना बोरोले, सचिन भिडे, डॉ.पंकज सोनवणे, प्रा.आरती भिडे यांनी पाहिले. केशरचना आणि नेलआर्ट या स्पर्धेचे आयोजन डॉ.सविता वाघमारे, डॉ.कल्पना पाटील, प्रा.सुजाता भंगाळे यांनी केले. पर्धांचे परीक्षण प्रा.डॉ.सिंधू भंगाळे व प्रा.तिलोत्तमा चौधरी यांनी केले. या स्पर्धांच्या यशस्वितेसाठी सर्व उपप्राचार्य, डॉ.गोविंद मारतळे, डॉ.गोपाळ कोल्हे, विद्यार्थी प्रतिनिधी स्वप्निल चौधरी, प्राजक्ता काचकुटे यांनी सहकार्य केले.