धनादेशावर स्वाक्षरीचे अधिकार फक्त गटविकास अधिकार्‍यांना

0

जळगाव। महाराष्ट्र विकास सेवा गट-ब मधील सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्या कामाचे सुधारीत वाटप करण्यात आले आहे. याबाबत शासनाने नवीन शासननिर्णय जारी केले आहे. अनुसुची 1 मधील 4 विषयांचा स्वतंत्र कार्यभार व संपूर्ण आर्थिक, प्रशासकीय अधिकार सहाय्यक गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. मात्र आर्थिक मंजुरीच्या धनादेशावर फक्त गट विकास अधिकारी (बीडीओ) यांचीच स्वाक्षरी ग्राह्य धरण्यात येणार आहे.

सहाय्यक गटविकास अधिकार्‍यांना मंजुरीचे अधिकार असून धनादेशावर स्वाक्षरीचे अधिकार त्यांना नाही. जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांना याबाबत पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. धुळे, नंदुरबार, गोंदिया जिल्ह्यातील गटविकास अधिकारी व सहाय्यक गटविकास अधिकारी यांना आर्थिक मंजुरी व बॅकेचे संयुक्त खाते असल्याने धनादेशावर स्वाक्षरीचे अधिकार देण्यात आलेले होते हा प्रकार लक्षात आल्यानंतर पंचायत समिती लेखा संहिता 1968 मधील नियम 29 नुसार छाननी केले असता गटविकास अधिकारी यांनीच धनादेशावर स्वाक्षरी करावी असे नमूद करण्यात आलेले आहे.