भुसावळ- धनादेश अनादरप्रकरणी दाखल खटल्यात सबळ पुराव्याअभावी एकाची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. रेेणुका माता मर्चंटस् को ऑप क्रेडीट सोसायटीतून दत्तू हिरामण चौधरी यांनी कर्ज वसुलीपोटी 52 हजार 950 रुपयांचा धनादेश होता. बँकेत हा धनादेश न वटल्याने पतसंस्थेने खटला दाखल केला मात्र सबळ पुराव्याअभावी न्या.एस.एल.वैद्य यांनी चौधरी यांची निर्दोष मुक्तता केली. चौधरी यांच्यातर्फे अॅड.विजय भीमराव तायडे यांनी काम पाहिले.