चाळीसगाव: तालुक्यातील कानिफनाथ सुरेश खतार याने 28 ऑक्टोंबर 2016 रोजी घाट रोड चाळीसगाव येथील जगसन मोटार अॅण्ड ट्रॅक्टर प्रा.ली. येथून 6 लाख 35 हजार रुपये किमतीचा महिंद्रा 575 सरपंच ऑइल ब्रेक ट्रॅक्टर 60 हजार रुपये रोख भरून व उर्वरित रक्कम फायनान्स साठी लागणारे कागदपत्र नंतर आणून देतो असे सांगून व नाशिक आणि चाळीसगाव येथील बंद असलेले ऍक्सिस बँक शाखेचे दिले होते.
मात्र आज पावेतो कुठलीही रक्कम न भरता त्याचप्रमाणे फायनान्स साठी कागद पत्र दिले नाही व तेव्हापासून ट्रॅक्टर घेऊन गेला होता. सदर जगसं मोटारचे मॅनेजर जगदीश भवरलाल जागेठिया यांनी सदर इसमाचा व ट्रॅक्टरचा मध्य प्रदेश येथील साखर कारखान्यावर त्याच प्रमाणे पाटणा इतर ठिकाणी शोध घेतला असता मिळून न आल्याने सदर आरोपीने जगसं मोटर्सची 5 लाख 75 हजार रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.