१ डिसेंबरपासून आदेशाची होणार अंमलबजावणी
मुंबई : वीज बिलाचा भरणा करण्यासाठी दिलेल्या धनादेशाचा कोणत्याही कारणामुळे अनादर (चेक बाऊंस) झाल्यास ३५० रुपयांऐवजी आता १५०० रुपये दंड किंवा बँक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या रकमेचा दंड ग्राहकाला लावण्यात येणार आहे. १ डिसेंबरपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात होणार आहे
महावितरणने वीजदराच्या निश्चितीकरणासाठी दाखल केलेल्या मध्यावधी आढावा याचिकेच्या सुधारित आदेशामध्ये महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने नुकताच हा आदेश दिला आहे. त्यामुळे आता चेक बाऊंस झाल्यावर ग्राहकांना त्याचा मोठा फटका बसणार आहे.
महावितरणने घरबसल्या वीज बिल भरण्यासाठी वेबसाईट, मोबाईल अॅप किंवा ईसीएसद्वारे सोय उपलब्ध केली आहे. त्यामुळे धनादेशाऐवजी वीजग्राहकांनी या ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.