धनूर शिवारातून मुलगा बेपत्ता

0

धुळे । शेतमजुरी करणारा सालदार टेट्या करजी देवरा हे धनूर शिवारातील शेत मालक शाम मधुकर ठाकरे यांच्या शेतात काम करतात. त्यांच्या समवेत त्यांचा मतीमंद मुलगा दिनेश टेट्या देवरा (वय 14) हा राहत होता. 21 ऑगस्ट रोजी वडील टेट्या देवरा हे शेतमालक मधुकर ठाकरे यांच्याकडे गेले असता त्यांचा मुलगा दिनेश देवरा हा शेतातुन कोठेतरी निघुन गेला किंवा कोणी अज्ञात व्यक्तीने मतीमंद असल्यामुळे त्यास पळवुन नेल्याची तक्रार सोनगीर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. दिनेश टेट्या देवरा वय 14 वर्षे, रंगाने सावळा, नाक सरळ, डोळे मोठे, केस काळे व मोठे, कपाळावर जुन्या जखमेची खुण, अंगात निळ्या रंगाचा व पांढर्‍या रेशा असलेला शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट असून सदर मुलगा हा मतिमंद बसल्याने बोलत नाही. तरी या वर्णनाचा मुलगा कुणाला आढळून आल्यास सोनगीर पोलिस ठाण्याचे हवालदार अशोक पवार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनगीर पोलीस ठाणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.