पणजी । उत्तर कर्नाटकातील कारवार येथून सुमारे 12 किलोमीटर अंतरावरील नागरमाडी धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेले गोव्यातील 6 पर्यटक बुडाले. तर 3 जण बेपत्ता आहेत. दक्षिण गोव्यातील मडगाव, वास्को येथील पर्यटक सहलीसाठी आले होते. धबधब्याच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने पर्यटकांची धांदल उडाली आणि काही जणांचा बुडुन मृत्यू झाला. पोलिस आणि अग्मिशमन दलाने तातडीने मदतकार्य सुरू केले. 3 पर्यटक वाहून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे. बुडालेल्यांमध्ये फ्रान्सिला पिरीस (21), फियोनो पाशेको (28), रेणुका (23), मारसेलिन मिकसिका, सिधु च्यारी (21), समीर गावडे यांचा समावेश आहे. बेपत्ता असलेल्यांमध्ये मोर्सेलिना मेक्सिका (38) यांचा समावेश आहे.