Threat To Security Guard In Jalgaon : ‘Chingya’ Sent To Nashik Jail जळगाव : खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या चिंग्याने कारागृहातील रक्षकाला खून करण्याची धमकी दिली होती. या प्रकरणानंतर चेतन आळंदे ऊर्फ चिंग्या याची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान, दरम्यान, पोलिसांच्या ताब्यात असताना (कैदी पार्टी) चिंग्याने मद्यप्राशन केल्याचा आरोप असून त्यामुळे पोलिसही अडचणी आल्याने त्यांचीही चौकशी करण्याचे संकेत पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत.
उपचारासाठी आल्यानंतर मद्यप्राशन
वैद्यकीय उपचारासाठी आल्यावर चिंग्याने मद्यप्राशन केले होते. कारागृहात दाखल झाल्यावर त्याने तेथे धिंगाणा घालून रक्षकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. याप्रकरणी चिंग्याविरुद्ध शनिवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल झाला. या वादामुळे त्याला पोलीस बंदोबस्तात नाशिक कारागृहात हलविण्यात आल्याची माहिती कारागृहाचे वरीष्ठ तुरुंगाधिकारी गजानन पाटील यांनी दिली. पोलिसांच्या ताब्यात असताना मद्यप्राशन केल्यामुळे ड्युटीवरील तिन्ही पोलिसांची चौकशी केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली.