धरणगाव । श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाच्या धरणगाव येथील महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक जगन्नाथ अहिरे यांच्या अश्लिल कृत्याची दखल घेत संस्थेने त्यांना निलंबित केले असून या प्रस्तावास जि.प. माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकार्यांची परवानगी मागीतली असतांना ती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा निषेधार्थ संस्थेचे अध्यक्ष विजय महाजन यांनी जि.प. मधील शिक्षणाधिकार्यांचा दालनाबाहेर आजपासून उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात अॅड. शरद माळी, प्रशांत वाघ, योगेश वाघ, नंदलाल महाजन, ज्ञानेश्वर महाजन, सुमित मराठे, विनायक महाजन, विनोद महाजन, धनराज महाजन, जितेंद्र महाजन, सुरेश महाजन, संजय पाटील यांनीही सहभाग नोंदविला आहे.
महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक जगन्नाथ अंबर अहिरे हे महिलेसोबत अश्लिल कृत्य करतांना 24 मार्च 2017 रोजी रंगेहाथ सापडले. यापूर्वीही त्यांनी अश्याच प्रकारची कृत्यामुळे संस्थेने त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव परवानगीसाठी जि.प.च्या माध्यमिक शिक्षणाधिकार्याकडे पाठविला, मात्र या प्रस्तावास अद्यापपर्यंत परवानगी मिळालेली नाही. याप्रकरणी विजय महाजन यांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकानांही लेखी निवेदन दिले मात्र कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेत विजय महाजन यांनी सकाळी 11 वाजेपासून जि.प. समोर उपोषण सुरू केले आहे. मुख्याध्यापक अहिरे यांच्या निलंबनास जोपर्यंत परवानगी दिली जाते.