Upazila hospital in Dharangaon will be sorted out : Testimony of Deputy Chief Minister पाळधी : काश्मीरमधील 370 कलम हटवणे, अयोध्येतील राममंदीर हे बाळासाहेबांचे स्वप्न आज भाजपने पूर्ण केले असून आम्ही त्यांच्यासोबत गेलो तर कोणता गुन्हा केला? असा सवाल पाळधीतील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, आम्हाला बाळासाहेबांचे विचार धाडसाने पुढे न्यायचे आहेत. त्यासाठी हे पाऊल उचलले आहे. धरणगाव उपजिल्हा रुगणालय, बालकवी ठोंबरे स्मारकाचा विषय लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांन दिले. गुलाबराव पाटील हे प्रामाणिक आणि कडवट शिवसैनिक आहेत, त्यांच्या पाठीशी रहा, असे भावनिक आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केले.
गुलाबराावांचा मी चाहता !
मुख्यमंत्री म्हणाले की, गुलाबराव पाटील हे शिवसेनेची बुलंद तोफ आहेत. मी देखील त्यांच्या भाषणाचा चाहता आहे. त्यांची भाषणं मलादेखील आवडतात. म्हणून मी त्यांना ठाणे जिल्ह्यातील निवडणुकांच्या वेळी भाषणं करायला घेऊन जातो. आपल्या भाषणापेक्षा गुलाबरावाचं भाषण चांगलं होईल, लोकं क्रेडीट देतील म्हणून त्यांचं भाषण रोखण्यात आलीय, असा गौप्यस्फोटदेखील मुख्यमंत्र्यांनी केला. ज्या गुलाबरावांनी बाळासाहेबांची शिवसेना वाढवली, त्याच गुलाबरावांचे पाय खेचण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
गुलाबरावांनी 22 हजार पाणी योजना आणण्याचा विक्रम केलाय
शिंदे म्हणाले, राष्ट्रवादीच्या एका आमदाराने मला सागिीतले की, मतदार संघात मोठी पाणीयोजना आणतोय. त्यानंतर पत्रकार परीषदा घेतल्या. असे करत करत चौथी पत्रकार परिीषद घेतली. त्यानंतर टेंडर निघाले. काम सुरु होईपर्यंत निवडणुका आल्या. मग योजना थंडबसत्यात गेली. सर्व कामे एकत्रित केली तर लोक निवडून देणार नाहीत, असे सांगितले. मात्र गुलाबरावांचे असे नाही. त्यांनी 22 हजार पाणी योजना आणण्याचा विक्रम केला.
मग भाजपासोबत जावून आम्ही काय गुन्हा केला
बाळासाहेबांची इच्छा काय होती, काश्मिरमधील 370 कलम हटवा. मला एक दिवस पंतप्रधान करा मी हे काम करेल, असे बाळसाहेब म्हणायचे. आणि ती इच्छा मोदी आणि शहांनी पूर्ण केली. राममंदीर व्हावे हे देखील बाळासाहेबांचे स्वप्न होते. त्याचे काम सुरु आहे. मग आम्ही त्यांच्याबरोबर गेलो तर काय गुन्हा केला? बेंबीच्या देठापासून का ओरडताय. तुम्ही असंगाशी संग केला, तेव्हा तुम्हाला काही वाटले नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यापुढे सोबत दोनशे आमदार असतील
भाजपचे 106 आणि आम्ही 50 आमची संख्या आज 156 च्या पुढे 170 पर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. आता फक्त 30 चा आकडा गाठायचा आहे. 200 क्रॉस झालो तरी नवल वाटायला नको. ग्रामपंचायतींच्या निकालांवरुन हे आपल्याला काल दिसून आले. एवढेच नव्हे तर संपूर्ण देशाने, जगाने आम्हा 50 लोकांची दखल घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले.