धरणगावात रक्तदान शिबिरात जोपासला सामाजिक एकोपा

0

धरणगाव । सहकार राज्यमंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 5 जून सोमवार रोजी भगव्या सप्ताहनिमित्य जळगाव येथील माधवराव गोळवलकर रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यामानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन धरणगाव शहरात तेली गल्ली येथे करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील शिवसैनिकांनी रक्तदान करून सामाजिक एकोपा साधून सहकार्य केले.

रुग्णांना फळे वाटप
भगव्या सप्ताहाच्या सांगता निम्मिताने तसेच गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने धरणगाव सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. रुग्णाच्या समस्या यावेळी शिवसैनिक व पदाधिकार्‍यानी समजून घेतल्या तसेच सहकारमंत्र्यानकडे नागरिकांना समस्या मांडण्यात येतील असे आश्वासित केले. रक्तदान शिबिराचे उदघाटन सहकार राज्यमंत्री मा ना गुलाबरावजी पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ, धरणगांव चे नगराध्यक्ष सलीम पटेल,तालुकाप्रमुख गजानन पाटील, शहरप्रमुख राजेंद्र महाजन, उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, नगरसेवक वासू चौधरी, पप्पू भावे, विलास महाजन, मोहन महाजन, विलास माळी, गोलू चौधरी, पप्पू कंखरे, बुट्या पाटील, दीपक पाटील, रवी जाधव, विशाल महाजन, निलेश पाटील, कमलेश बोरसे, राहुल महाजन व सर्व शिवसेना, युवासेना व विद्यार्थी सेना नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.