धरणगावात विविध विकास कामांचे भूमिपूजन

0

धरणगाव । महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री परभणीचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात नगरपरिषदेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. 9 लक्ष लिटर पाण्याची टाकी बांधकाम, महात्मा गांधी उद्यान ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत नवीन पाईप लाईन टाकणे, सोनवद रस्ता स्मशानभूमी अद्यावत करण्याचे कामे होणार आहे.

नगराध्यक्ष सलीमभाई पटेल, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ, संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, उपनगराध्यक्ष सुरेखा महाजन, महानंदाताई पाटील, सचिन पवार, सुरेश चौधरी, भानुदास पाटील, पी.एम.पाटील, प्रतापराव पाटील, गोपाल चौधरी, गजानन पाटील, राजेंद्र महाजन, संतोष महाजन हस्ते भुमिपूजन करण्यात आले. यावेळी संजय पाटील, उषाताई वाघ, विलास महाजन, पप्पू भावे, वासू चौधरी, मुकुंद ननावरे, भागवत चौधरी, सुरेश महाजन, संजय चौधरी, सपना वसावा, किरण मराठे, उज्वला पारेराव, आराधना पाटील, बुट्या पाटील, धिरेंद्र पुरभे, राहुल रोकडे, अजय चव्हाण सुनील चौधरी, निलेश पाटील, आबा माळी, नवल पाटील आदी तसेच सर्व शिवसेना, युवासेना, विद्यार्थी सेना नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संयेने उपस्थित होते.