धरणगाव कृउबा सभापतीपदी रविंद्र महाजन बिनविरोध

0

एरंडोल। धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपाचे रवींद्र शांताराम महाजन यांची तर उपसभापतीपदी रंगराव सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली. सभापती व उपसभापती यांची बिनविरोध निवड जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. विद्यमान सभापती भीमराव जाधव व उपसभापती देविदास मराठे यांनी आपला एकवर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यामुळे ही निवड करण्यात आली. सहाय्यक निबंधक किशोर पाटील अध्यक्षस्थानी होते. या निवडीबद्दल माजी मंत्री एकनाथ खडसे, जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन, भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, जि.प. अध्यक्षा उज्वला पाटील, नगराध्यक्ष रमेश परदेशी, तालुकाध्यक्ष एस.आर.पाटील, ओ.बी.सी.सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी यांच्यासह आदींनी अभिनंदन केले आहे.

सभापती पदासाठी रवींद्र महाजन तर उपसभापती पदासाठी रंगराव सावंत यांचेच अर्ज असल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनियुक्त सभापती रवींद्र महाजन हे एरंडोलचे माजी नगराध्यक्ष आहेत. यावेळी भाजपचे विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर, समन्वय समितीचे अध्यक्ष पी.सी.पाटील, काँग्रेसचे डी.जी.पाटील, भाजपचे सुभाष पाटील, पं.स. माजी सभापती सुनील पवार, भाजपचे तालुकाध्यक्ष संजय महाजन,शिरीष बयस, एन.डी.पाटील, संजय चव्हाण, रवी पाटील, डॉ.मुंदडा, डॉ.विलास चव्हाण, शंकर पाटील, शेखर पाटील, माजी नगरसेवक सुनील पाटील,नवल पाटील,अविनाश पवार,सुनील वाणी,प्रशांत महाजन, ईश्वर पाटील यांचेसह सर्व संचालक व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.