धरणगाव । धरणगाव तालुका राष्ट्रवादी-काँग्रेस पार्टी शेतकर्यांचा हितासाठी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे विविध मागण्यांसह रस्त्यावर उतरले आहेत. झोपी गेलेल्या शासनाला जाग आणण्यासाठी 20 मे 2017 वार शनिवार रोजी धरणगाव तहसिलवर संघर्ष मोर्चाचे आयोजन केले असून राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकर्यांचे मुलं बेरोजगार झालेले आहेत, शेतकर्यांच्या मुलींचे लग्न थांबले असून नैसर्गिक आपत्तीही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे गहू, हरभरा, मका, केळी सारख्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले असून आसमानी-सुलतानी संकट असूनही हे सरकार मात्र शेतकर्याला कर्जमुक्त करत नाही. या सरकारला बळीराजा विषयी काही सुतक-सोयर नाही म्हणून विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा असल्याची माहिती माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे – या प्रमुख मागणीसह शेतकर्यांना कृषीसाठी 24 तास विज मिळालीच पाहिजे. शेतकर्यांचा शेतीमालाल हमीभाग मिळाला पाहिजे, कापसाला 7000 हजार रू. भाव मिळाला पाहिजे, कापसाची आयात त्वरित थांबवावी, वृध्द शेतकर्यांना आणि भूमीहिन शेतमजूराला पेंशन योजना लागू करावी. शासनाच्या हमीभावांचा शेतमाल खरेदी झाली पाहिजे यासाठी तालुक्यातील सर्व शेतकर्यांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.