जळगाव । जळगाव, धरणगाव, पाळधी शहरासह तालुक्यातील ईतर गावात सुरू असलेली अवैध्य दारू विक्री , संट्टा ,पत्ता ,मटका सह सुरू असलेले सर्वच अवैध्य धंदे सुरू आहे. हे सर्व अवैध्य धंदे त्वरीत बंद करावेत. याबाबतचे निवेदन माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकार्यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराडे यांना निवेदन दिले. यावेळी कार्यकतर्ंही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धरणगाव शहरात आठवडे बाजार परिसर, बीएस.एन् एल . कार्यालयाजवळ, डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळया जवळ अशा विविध ठिकाणी देशी , विदेशी . दारुची मोठया प्रमाणावर विक्री होते .या शिवाय ठिक ठिकाणी सट्टा, मटक्याचे आकडे घेतले जातात . तर अनेक ठिकाणी पत्त्याच्या जुगार क्लब सुरू आहेत . हिच परिस्थिती पाळधी शहरात तर हे सर्व धंदे मुख्य रस्त्यावरच सुरू आहे .ईतर लहान मोठया गावात हिच परिस्थिती आहे.यामुळे तरूण पिढी वाईट मार्गावर जात असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. शासनाच्या निर्णय रस्त्यावरील दारू बंदीमुळे एकही अधिकृत परमिट रूमबार नाही.तरीही अनेक ठिकाणी अवैध दारूविक्री जोरात सुरू आहे.फरक ईतकाच आहे की, ती दारू जादा दराने विक्री जात आहे.तरी पोलिस प्रशासन बघ्याची भुमिका घेत आहे. प्रथमच या अवैद्य व्यवसायाविरोधात निवेदन देत असल्याचे गुलाबराव देवकर यांनी बोलून दाखविले . तालुक्यातील सुरू असलेल्या या सर्वच अवैध्य व्यवसाईकावर आपण या आठ दिवसात त्वरीत कारवाई करू असे . अश्वासन पोलिस अधिक्षक दत्तात्र्यय कराळे यांनी यावेळी दिले . या प्रसंगी दिपक वाघमारे, रमेश पाटील, नाटेश्वर पवार, संभाजी कंखरे, निलेश चौधरी, मोहन पाटील, भूषण पाटील, भगवान शिंदे, वाल्मिक पाटील, अजय महाजन, सुनिल बाविस्कर उपस्थित होते .